आजकाल ऐन पंचविशीतल्या महिलांना देखील उठलेलं बसता येईना आणि बसलेलं उठता येईना, अशी अवस्था झाली असेल तर सावधान! कारण तुमच्या गुडघ्याची झीज झालेली असू शकते.
सामान्यपणे गुडघेदुखीचं प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असतं. अलीकडे उतार क्याप्रमाणे तारुण्यातही गुडघेदुखी असल्याचं दिसतं.
भारतामध्ये जवळपास ३० टक्क्यांपेक्षा जास्त लोक गुढघेदुखी मुळे त्रस्त आहेत. वाढत्या वयाप्रमाणे झीज वाढत गेल्यामुळे गुडघ्याच्या वेदनातीव्र होतात. त्याअनुषंगानं चालणं, फिरणं, उठणं, बसणं, मांडी घालणं, यांसारख्या क्रियांवरच नियंत्रण येऊ लागतं.
मागील काही काळापासून गुडघेदुखी ची समस्या असणाऱ्यांची संख्या तर वाढली आहेच; पण वयाच्या पन्नाशीत गाठणारा हा आजार आता तिशीतच युवापिढीला गाठतो. विशेषत: महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणत उद्भवत असल्याचे चित्र आहे.
बदलत चाललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव व योग्य व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे आढळून येते, सांध्यांचे दुखणे, गुडघेदुखी हे त्यातीलच एक. लिफ्टचा वापर, सतत गाडीवर फिरणे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती यांमुळे हे दुखणे कमी वयात डोके वर काढते.
लठ्ठपणा हेही गुडघेदुखीचे एक महत्त्वाचे कारण आहे. अनेकदा महिलांना दीर्घकाळ ओट्यापुढे उभी राहिल्याने, सतत कष्टाची कामे केल्याने गुडघे दुखू शकतात, तर तुम्ही वापरत असलेली पादत्राणे योग्य नसतील, घराची फरशी कडक असेल तर टाचा आणि त्यानंतर गुडघे यांचे दुखणे मागे लागते.
तेव्हा या सगळ्या गोष्टींबाबत वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. आता यामध्ये दोन प्रकार पाहायला मिळतात. एक क्रॉनिक दुखणे म्हणजेच जुने दुखणे तर एक तात्पुरते दुखणे. एखाद्या किरकोळ अपघाताने उदभवलेले तात्पुरते दुखणे अनेकदा व्यायाम,औषधोपचार यांनी बरे होते. पण हे दुखणे जर दीर्घकाळचे असेल तर मात्र ते बरे होण्यास बराच कालावधी जावा लागतो.
गुडघे का दुखतात?
शरीरातील हाडे आणि सांधा महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, संधिवात झाला तर हाडे कमजोर होऊन सांधेदुखीची समस्या निर्माण होते.
सांधा म्हणजे गुडघा. हा सुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी आणि संधिबंधांनी तयार होतो. भारतात आपण गुडघ्याचा वापर जरा जास्तच करतो. मांडी घालून बसणे पाय दुमडून बसणे आदी अनेक क्रियांमुळे गुडघ्यांच्या हालचाली अधिक होऊन तेथील हाडे झिजणे, तेथील वंगण’ कमी होणे किंवा अतिउष्णतेमुळे गुडघ्याला सूज येते. त्यामुळे गुडघे दुखी समस्या सुरू होते.
गुडघे दुखी होऊ नये म्हणून
- लठ्ठपणामुळे गुडघ्याच्या सांध्यांवर ताण येतो, त्यामुळे वजन आटोक्यात ठेवणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे.
- नियमित चालण्याचा व्यार अतिशय गरजेचा आहे. गुडघे दुखी उद्भवू नये म्हणून प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे.
- लिफ्टचा वापर न करता पायांनी चढ उतार करा, यामुळे गुढघ्यातील वंगण चांगले राहण्यास मदत होते आणि गुडघेदुखीला तुम्ही दूर ठेवू शकता.
- हाडांची झीज योग्य पद्धतीने भरून निघाल्यास अशाप्रकारचे दुखणे उद्भवत नाही. यामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश ठेवावा. दूध-दुधाचे पदार्थ, मासे, अंडी, सुकामेवा यांसारख्या पदार्थांमुळे हाडांची झीज भरून काढण्यास मदत होते.
- सकाळच्या कोवळ्या उन्हात ‘ड’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते. शरीराला ड जीवनसत्त्व मिळाल्याने हाडांमध्ये कॅल्शियम पुरेशा प्रमाणात शोषले जाते.
- गुडध्यांना मार लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
- सतत ओट्यापुढे किंवा इतर ठिकाणी उभे राहून काम असल्यास अर्ध्या तासाने ५ मिनिटे खाली किंवा खुर्चीत बसावे, यामुळे गुडघ्यांना आराम मिळू शकतो.
व्यायाम का गरजेचा?
वाढलेले वजन आणि व्यायामाचा अभाव सांधेदुखीला कारणीभूत ठरतात.
चालताना, पायांनी चढ व्यायाम करताना गुडघ्याची दोन हाडे चांगले एकमेकांवर दाबली जातात. असे होताना दोन हाडांमधील वंगणही हाडांवर दाबले जाऊन ते हाडाच्या आवरणामधून आत झिरपते. या वंगणात प्राणवायू असतो.
वंगण कूर्चेच्या आत दाबले गेल्याने कूर्चेचे पोषण होते आणि कूर्चा निरोगी राहते. अर्थातच तो सांधाही निरोगी राहतो. म्हणून व्यायाम महत्त्वाचा. वजन आटोक्यात राहणे हा व्यायामाचा अप्रत्यक्ष फायदाअसतो.
गुडघ्याची झीज कशी होते?
व्यक्तीचे वय लहान असताना अपघातहोणे, संधिवात, युरिक अॅसिड वाढलेले असणे, सोरायटिक आर्थरायटिस असणे या कारणांमुळे गुडघेदुखी होऊ शकते.
पण गुडघा झिजल्यामुळे झालेली गुडघेदुखी साधारणपणे वयाच्या साठी नंतरच डोके वर काढते.
जर तुम्हाला गुढघे दुखीचा त्रास असेल तर त्वरित डॉ निखिल गद्रे यांचा सल्ला घ्या
Add a Comment